

भिलार : महाबळेश्वर तालुक्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारचे पठार विविध आकर्षक फुलांनी बहरले आहे. ही फुले पर्यटकांना खुणावू लागली आहेत. विविध प्रकारची फुले बहरू लागली असून ही फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या या पठारावर चाहूर, निळलवंती, मिकी माऊस, गेंद, उदिचिराईत, तेरडा, सोनकी अशा सप्तरंगी फुलांची मुक्त उधळण झाल्याची दिसून येत आहे. फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या फुलांचे वैभव पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटक भेटी देत आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी फळे प्राणी व सरपटणार्या प्राण्यांचे जीव येथे आढळून येतात. निसर्गरम्य अद्भुत ठेवा असलेले निसर्गाचा अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेटी देत आहेत. सद्यस्थितीत पाचगणी परिसरातील डोंगर पठारावरची विविध रानफुले बहरू लागले. त्यामुळे भिलारच्या पठारावरही फुलांना बहर आला आहे.
वनपरिमंडल अधिकारी आर. व्ही. काकडे, वनरक्षक बी. एस. जावीर, संजय भिलारे, साहेबराव पारठे, सरपंच शिवाजी भिलारे, नितीनदादा भिलारे, प्रवीण भिलारे, शिवाजी भिलारे, सचिन भिलारे ग्राविकास अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी या पठाराची पाहणी केली.