बस चालकाला मारहाण; सीआरपीएफ जवानावर गुन्हा

दुचाकीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून कृत्य : बसस्थानकातही घातला गोंधळ
Satara News
बस चालकाला मारहाणPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महामार्गावरील उडतारे फाटा येथे एसटीने दुचाकीला ओव्हरटेक केल्यानंतर त्याचा राग आल्याने सीआरपीएफमधील जवान व त्याच्या साथीदाराने एसटी चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. अजय गणपत शिर्के (वय 31, मूळ रा. आढूळ, ता. पाटण सध्या काश्मीर) व रोहित रघुनाथ साळुंखे (वय 24, रा. चिखली, पुणे) या दोघांविरुध्द विलास भगवान उमापे (वय 47, रा. उंब्रज ता.कराड) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील अजय शिर्के हा सीआरपीएफ जवान आहे.

Satara News
Arrest Lucknow Girl : कॅब चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महामार्गावर उडतारे फाटा व सातारा एसटी डेपोत घडली आहे. तक्रारदार विलास उमापे हे एसटी चालवत असताना उडतारे येथे संशयित अजय शिर्के व रोहित साळुंखे याच्या दुचाकीला ओव्हरटेक केले.

या कारणातून दुचाकीवरुन दोघे चिडले व दुचाकीवरुन एसटीचा पाठलाग करत रस्त्यावर एसटी अडवली. संशयित दोघांनी एसटी चालकाकडील दरवाजा उघडून चालकाला जबरदस्तीने खाली उतरवले. यावेळी संशयित दोघांनी एसटी चालकाला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. ‘आम्ही पोलिस आहे. तुम्हाला आमच्यावर काय केस करायची ती करा,’ असे म्हणत बघून घेण्याची धमकी दिली. या घटनेने प्रवासी घाबरले व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Satara News
डोंबिवली : रिक्षा चालकाला तीन मित्रांकडून मारहाण

या घटनेनंतर एसटी चालकाने एसटी सातारा डेपोत आणली. यावेळी संशयित दोघे दुचाकीवरुन सातारा एसटी डेपोत आले. याठिकाणी केबिनमध्ये येवून संशयित दोघांनी पुन्हा वाद घातला. एसटी डेपोत पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. वादावादी सुरु असतानाच संशयित दोघांनी पुन्हा तक्रारदार एसटी चालकाला मारहाण करत दमदाटी, शिवीगाळ केली. दोन्ही ठिकाणी मारहाण झाल्यानंतर एसटी चालक यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीचा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news