सातारा : पुसेसावळी येथे दरोडेखाेरांच्‍या हल्ल्यात महिला जखमी, ५ लाखांचाऐवज लंपास

सातारा : पुसेसावळी येथे दरोडेखाेरांच्‍या हल्ल्यात महिला जखमी, ५ लाखांचाऐवज लंपास
Published on
Updated on

पुसेसावळी, पुढारी वृत्तसेवा: सातारा येथील पुसेसावळीत मंगळवारी मध्‍यरात्री दराेडेखाेरांच्‍या टाेळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे १२ तोळे सोने, १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी संजय आप्पासो कदम यांनी पुसेसावळी पोलीसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, माने कुटुंबीय रात्रीचे जेवण करुन झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री
दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची पत्नी सारीका यांनी घरात कोणीतरी शिरल्याचे माहिती संजय यांना दिली. घरात शिरलेल्या दराेडेखाेरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण केली. यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news