Ashadhi Wari | मदतीची वारी लाखो वारकर्‍यांपर्यंत

दोन्ही पालखी मार्ग आणि पंढरपूर यात्रेत अभियान
Ashadhi Wari |
लोणंद : मदत व पुनर्वसन विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरता राबवण्यात आलेल्या अभियानात सहभागी स्वयमसेवक.Pudhari Photo
Published on
Updated on

लोणंद : आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी भाविक भक्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी वारीमध्ये सहभागी होत असतात. याच पायी वारीत मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने पहिल्यांदाच प्रचार व प्रसिद्धी अभियान वारी उपक्रम राबवला असून तो यशस्वीपणे पार पडला. पालखी मुक्कामी वारकरी मनोरंजन व प्रबोधनात्मक पद्धतीने जनजगृती करण्यात आली. त्यास वारकरी व भाविक भक्तांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीकरता हे अभियान राबवण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर व पंढरपूर यात्रा कालावधीमध्ये दि. 27 जून ते 10 जुलै 2025 दरम्यान हे प्रचार व प्रसिद्धी अभियान पार पडले. या अभियान वारीत विविध लोककलांचा समावेश करण्यात आला होता. किर्तन, पारंपरिक वासुदेव, भारुड, पथनाट्य, चित्ररथ व एलईडी व्हॅन्स याव्दारे विभागाने राबवलेले निर्णय आणि योजनांची प्रसिद्धी करण्यात आली. दोन्ही पालखी मार्गांवर 100 हून अधिक कलाकारांनी या अभियानात सहभाग घेऊन जनजागृती केली. या कलाकारांनी मदत व पुनर्वसन विभागाचे निर्णय व काम वारीमध्ये प्रभावी मांडले. तसेच पालखी विसावा व पालखी तळ आणि पंढरपूर शहराच्या विविध प्रवेशद्वारांवर योजनांची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.

लोणंद येथे उभारण्यात आलेले स्वागतपर भव्य कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. तसेच ईसबावी -पंढरपूर येथील झिप हॅाटेलसमोर विभागाचे वारकर्‍यांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. याठिकाणी वारकरी बांधवांना विभागाच्यावतीने दोन दिवस भाविक भक्तांना मोफत हजारो पाणी बॅाटल्सचे वाटप करण्यात आले होते. लोणंद येथेही मोफत जेवण व पाणी वाटप करण्यात आले. पंढरपूर यात्रा कालावधीत हे अभियान एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर व 65 एकर आदी परिसरात सुरु ठेवण्यात आले होते. मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रचार व प्रसिद्धी अभियानाची सुरुवात ना. मकरंद पाटील व सह सचिव संजय इंगळे यांच्या हस्ते लोणंद येथे करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news