स्वारगेट घटनेमुळे फलटणमध्ये संताप

घटनेच्या सखोल चौकशीची जिल्हावासीयांतून मागणी
स्वारगेट घटनेमुळे फलटणमध्ये संताप
File Photo
Published on
Updated on

फलटण/तरडगाव : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर फलटण तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. बसस्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित तरुणी ही फलटण तालुक्यातील एका गावात राहते. ती पुण्यात कामाला असून गावी येत असते. मंगळवारी पहाटे स्वारगेट ते सोलापूर या बसमधूनच ती फलटणला येणार होती. त्यापूर्वीच तिच्यावर अत्याचार झाला. या घटनेनंतर प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हावासीयांतून होत आहे.

पीडिता पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास...

पीडित तरुणी पुणे येथे 4 ते 5 वर्षांपासून वास्तव्यास असून ती तेथील एका रुग्णालयात काम करत असल्याचे समोर आले आहे.

पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना एसटी प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षेबाबत एसटी प्रशासनाने काळजी घेतली असती तर ही घटना टाळता आली असती. एसटी प्रशासनाने याचा बोध घेणे गरजेचे आहे. घटनेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. त्याच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तर ही घटना घडली नसती. समाजामध्ये अशा प्रवृत्तीचे अनेक सराईत गुन्हेगार उजळमाथ्याने फिरतात त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. अत्याचार करणार्‍या नराधमास तातडीने ताब्यात घेऊन त्यास कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फलटणकरांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. तसेच संबंधित मुलीच्या पाठीशी सर्व फलटणकर ठामपणे उभे आहोत. त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध.
- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news