जिल्ह्यातील जीबीएसच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर
सातारा : सातारा जिल्ह्यात जीबीएसचे पाच रूग्ण आढळले असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकही रूग्ण नव्याने आढळला नसून कराड तालुक्यातील ज्या गावात रूग्ण सापडला आहे. त्या गावात घर टू घर आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
सातारा जिल्ह्यात जीबीएसचे 5 रूग्ण आढळले असून जिल्हा रूग्णालयात एक, सातार्यातील खासगी रुग्णालयात तीन व कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. जीबीएसच्या रूग्णांवर देखरेख तसेच योग्य उपचार होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या पाच रूग्णांव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यात नव्याने एकही रूग्ण आढळून आलेला नाही. मात्र कराड तालुक्यातील ज्या गावात रूग्ण सापडला आहे. त्या गावातील घरांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

