Satara AI Investment Scam: ‘एआय' गुंतवणुकीच्या बहाण्याने २८ लाखांना चुना

इन्‍स्‍टाग्राम या सोशल मीडियावरील जाहिरात पाहून त्‍याद्वारे एआय मध्ये पैशांची गुंतवणूक केल्‍यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फसवणूक
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

सातारा : इन्‍स्‍टाग्राम या सोशल मीडियावरील जाहिरात पाहून त्‍याद्वारे एआय मध्ये पैशांची गुंतवणूक केल्‍यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फसवणूक केली. सातार्‍यातील व्‍यावसायिकाला २७ लाख ४२ हजार ५०१ रुपयांचा चुना लागला असून, शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्‍हा दाखल झाला आहे.

रवी शर्मा, नेहा शर्मा यांच्या विरुद्घ हर्षद शहा (वय ६४, रा. आयटीआय रोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली. मे ते जुलै २०२६ या कालावधीत घटना घडली. तक्रारदार हे इन्‍स्‍टाग्राम पाहत असताना त्‍यांना एक जाहिरात दिसली. त्‍यावर ‘एआय’मध्ये गुंतवणूक केल्‍यास चांगला परतावा मिळेल, असा मजकूर होता. तक्रारदार यांना फोन आला. त्‍यावरून त्यांना ज्यादा पैशाचे आमिष दाखवले.

शहा यांनी गुगल पे, आरटीजीएसद्वारे पैसे वेळोवेळी पाठवले. २८ लाख रुपयांची रक्‍कम पाठवल्‍यानंतरही जादा परतावा मिळत नसल्‍याने तक्रारदार यांना शंका आली. त्‍यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधून मूळ रक्‍कम व जादा परताव्‍याची रक्‍कम मागितली. मात्र, नंतर तक्रारदार यांचा संशयितांसोबत संपर्क होईना. फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news