धोकादायक होर्डिंगवर पुन्हा जाहिरातबाजी सुरू

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धुडकावले
Satara Dangrous Hordings
विद्यानगरमधील सांगाडे हटणार का?Pudhari Photo
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा

अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविण्याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींना सूचना केल्या होत्या. यानंतर त्या होर्डिंगवरील जाहिराती गायब झाल्या होत्या. सांगाडे हटविण्याबाबत मात्र टाळाटाळ झाली. वातावरण निवळताच पुन्हा या सांगाड्यांवर जाहिराती झळकू लागल्या आहेत. याकडे प्रशासन लक्ष देणार का, असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Satara Dangrous Hordings
सातारा : जिल्ह्यातील 25 शाळांमध्ये घडणार बालवैज्ञानिक

होर्डिंग कोसळून मुंबई येथे काहींना जीव गमवावा लागला होता. याची गंभीर दखल घेऊन अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविण्याबाबत प्रशासनाने संबंधितांना सूचना केल्या होत्या. यानंतर शहरातील धोकादायक होर्डिंग काढण्यात आली. काही ठिकाणचे सांगाडे मात्र तसेच होते. ते हटविण्याबाबत नगरपालिका व ग्रामपंचायतींनी टाळाटाळ केली होती. काहींनी तडजोडी केल्याच्या चर्चा आहेत. कराड शहरात अशा धोकादायक होर्डिंगवर पुन्हा जाहिराती झळकू लागल्या आहेत. या जाहिराती लावताना संबंधितांनी नगरपालिकेची परवानगी घेतली आहे का? नसेल तर नगरपालिका प्रशासनाने अशा जाहिरातदारांवर कारवाई करण्याची गरज आहे. कराड शहरात अशा जाहितींनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून होर्डिंग लागले आहेत.

Satara Dangrous Hordings
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर होर्डिंगचीही तपासणी; महापालिकेची 53 होर्डिंगवर कारवाई

सैदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत धोकादायक सांगाडे उभा करून जाहिरातबाजी केली जात होती. हे सांगाडे विनापरवाना उभा केले गेले होते हे चौकशीत समोर आले आहे. असे असताना हे सांगाडे दोन महिन्यांनंतरही अद्याप हटविले गेलेले नाहीत. सैदापूर ग्रामपंचायत हे सांगाडे हटविण्याबाबत टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर सांगाडे हटविण्याबाबत कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news