

ढेबेवाडी : काढणे (ता. पाटण) येथील वनविभागाच्या हद्दीत विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडून त्यातील दोन संशयितांना पकडून त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दिपक शंकर पवार (रा. कुठरे) व दत्तात्रय ऊर्फ कैलास रामचंद्र लोहार (रा. साईकडे, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वनविभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत ढेबेवाडी वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र-पाटण खालील खळे येथील वनविभागाच्या हद्दीत रात्रगस्ती दरम्यान काढणे गावाच्या हद्दीत लाकडाची विनापरवाना अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार ट्रकमधून विनापरवाना तोड केलेले 24 घनमीटर पेक्षा जास्त जळावू लाकूड घेऊन जात असताना आढळून आला. तो ट्रक व लाकुड जप्त करण्यात आले.सदरचे वन गुन्ह्यासाठी 1 वर्ष कारावास किंवा 5 हजारापर्यंत दंड किवा दोन्ही शिक्षा अशी तदतूद कायद्यामध्ये आहे. साताऱ्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, भोसगांवचे वनपाल शशिकांत नागरगोजे, खळ्याचे वनरक्षक अमृत पन्हाळे, कुंभारगावचे वनरक्षक अश्विनकुमार यांनी ही कारवाई केली.