सातार्‍यात पोलिसावर कोयत्याने वार

हटकल्याच्या रागातून कृती : चौघांवर गुन्हा; एकाला अटक
A policeman was stabbed with a spear in Satara
सातार्‍यात पोलिसावर कोयत्याने वारPudhari File Photo
Published on
Updated on

सातारा बसस्थानक परिसरात हुल्लडबाजी करणार्‍यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने पोलिसावरच कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली. जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरु असून चौघा संशयितांपैकी एकाला अटक केली आहे. आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ऑन ड्युटी असणार्‍या पोलिसावरच वार झाल्याने कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अभिषेक उर्फ सोेम्या गणेश आवारे (मूळ रा. मतकर कॉलनी, सातारा, सध्या रा. कोंडवे ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दत्तात्रय गौरीहार पवार (वय 55, सध्या रा. सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून त्यांनी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 27 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता सातारा मध्यवर्ती बसस्थानकात घडली आहे. पोलिस दत्तात्रय पवार यांची सध्या सातारा तालुका पोलिस ठाण्यात नियुक्ती आहे. मात्र, प्रतिनियुक्तीवर ते सातारा शहर पोलिस ठाण्या अंतर्गत एसटी स्टॅन्ड चौकीत कर्तव्य बजावत आहेत.

साताऱ्यात पोलिसावर हल्ला, मारहाण करणारा ताब्यात

पोलिस दत्ता पवार हे शनिवारी स्टॅन्ड चौकी परिसरात गस्त घालत असताना तेथे काही युवक हुल्लडबाजी करत होते. यावेळी संशयित अभिषेक याच्यासोबत अन्य दोघे होते. पोलिसाने त्यांना हटकल्याने त्यांना याचा राग आला. ‘एसटी स्टॅन्ड तुझ्या बापाचे आहे का? येथून जायला सांगणारा तू कोण?’, असे म्हणत दोन्ही संशयितांनी पोलिसासोबत वाद घातला. या घटनेमुळे एसटी स्टॅन्ड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आणखी एक संशयित मयूर पवार तेथे आला. ‘तुझ्यासारखे लय पोलिस बघितले. थांब तुला दाखवतोच,’ असे म्हणत तिघे संशयित तेथून दुचाकीवरुन पसार झाले.

A policeman was stabbed with a spear in Satara
सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला

या घटनेनंतर दहा मिनिटांनी संशयित अभिषेक याच्यासह अन्य तीन साथीदार दुचाकीवरुन पुन्हा एसटी स्टॅन्ड परिसरात आले. संशयित टोळक्याने पोलिसाला पुन्हा शिवीगाळ, दमदाटी करत दहशत माजवली.‘ह्याला जिवंत सोडायचे नाही. खल्लास करुन टाकू,’ असे म्हणत चौघांनी पोलिसावर हल्ला चढवला. एका संशयिताने सॅकमधील कोयता काढून पोलिसावर वार केला. हल्ल्यात पोलिसाच्या काखेवर वार झाल्याने ते जखमी झाले. पोलिसावर हल्ला झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे हल्लेखोर दुचाकीवरुन तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत पोलिसाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

A policeman was stabbed with a spear in Satara
पिंपरी येथे निलंबित पोलिसावर जीवघेणा हल्ला

रात्रभर पोलिसांची भिरकीट..

सातार्‍यात पोलिसावर वार झाल्याने पोलिसांची झोप उडाली. हल्लेखोरांची माहिती घेवून तात्काळ त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. पोलिसांची रात्रभर भिरकीट सुरु होती. या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात एक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news