घरपट्टी न भरल्याने अनिल जगताप यांचे पंचायत समितीचे सदस्यत्व रद्द | पुढारी

घरपट्टी न भरल्याने अनिल जगताप यांचे पंचायत समितीचे सदस्यत्व रद्द

भुईंज; पुढारी वृत्तसेवा : वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती व केंजळ गणाचे विद्यमान सदस्य अनिल बुवासाहेब जगताप यांनी अडीच वर्षे घरपट्टी न भरल्याने त्यांचे सदस्यत्व पुणे विभागीय आयुक्तांंनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत किसनवीर कारखान्याचे संचालक व अनिल जगताप यांचे प्रतिस्पर्धी प्रविण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी विभागीय आयुक्तांची निकाल प्रत दाखवत वाई पंचायत समितीचे सदस्य अनिल जगताप हे अपात्र झाल्याचे सांगितले.

या प्रकरणाची सुनावणी पुणे विभागीय आयुक्तांच्या पुढे झाली होती. त्याचा अंतिम निकाल 1 नोव्हेंबर 2021 ला लागला होता. वाई पंचायत समिती सदस्य अनिल जगताप यांनी सन 2017 एप्रिल पासून ते सन 2019 सप्टेंबर पर्यंत घरपट्टी भरलेली नव्हती. दरम्यान केंजळ ग्रामपंचायतीने दोन ते तीन वेळा याबाबत नोटीस दिलेली होती. प्रविण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी याप्रकरणी पुणे विभागीय आयुक्ताकडे सन 2019 ला दाद मागितली. परंतु कोविड 19 च्या लॉकडाऊनमुळे ही सुनावणी लांबली गेली व तिचा निकाल 1 नोव्हेंबर 2021 लागला व विभागीय आयुक्तांनी अनिल जगताप यांना अपात्र ठरवले.

Back to top button