Satara | आठ वर्षाच्या मुलीने न चुकता सादर केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा, एकटत पाहत राहिले छ. उदयनराजे भोसले

8-year-old girl Shivaji Maharaj valor Udayanraje Bhosale - जलमंदिर पॅलेसमधील हृदयस्पर्शी प्रसंग : उदयनराजेंनी केले कौतुक
satara
चिमुरडीची शिवपराक्रमाची गाथा ऐकताना खा. उदयनराजे भोसले. pudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि त्यांच्या विचारांप्रती असलेली आस्था एका चिमुकलीच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी जलमंदिर पॅलेस येथे अनुभवायला मिळाली. या चिमुकलीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा अत्यंत आत्मविश्वासाने आणि तालासुरात सादर केली. हे ऐकताना उदयनराजे काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत भारावले.

नकाशपुरा पेठेतील कल्याणी शिंदे या आठ वर्षाच्या चिमुकलीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही शब्द न चुकवता गाथा सादर केली. तिच्या आवाजातील आत्मविश्वास, पाठांतर आणि तालासुरातील सादरीकरण पाहून उदयनराजेंनाही तिचे कौतुक वाटले.

चिमुकली गाथा सादर करत असताना उदयनराजे शांतपणे ऐकत राहिले. तिच्या सादरीकरणात कोणताही खंड पडला नाही. चिमुकलीचे काव्य पूर्ण झाल्यानंतर उदयनराजेंनी या चिमुकलीचे मनापासून कौतुक केले. तिच्या या खास क्षणाची आठवण कायम राहावी म्हणून त्यांनी तिला सरप्राईज म्हणून डेअरी मिल्क कॅडबरीची भेट दिली. अचानक मिळालेल्या या गोड भेटीने चिमुकलीचा आनंद द्विगुणित झाला. तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा त्या प्रसंगाचा विशेष आकर्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा, ती सादर करण्यामागील चिमुकलीचा उत्साह आणि उदयनराजेंनी केलेले कौतुक यामुळे जलमंदिर पॅलेसमधील वातावरण काही काळ भावनिक झाले.

लहान वयात शिवरायांच्या पराक्रमाची आणि संस्कारांची ओळख जपत ही चिमुकली गाथा सादर करीत असल्याचे पाहून उपस्थितांनाही हा क्षण विशेष भावला.

satara
Jaykumar Gore | पदवीधरमधून स्मितादेवी जाधव यांना मताधिक्क्याने निवडून आणू : ना. गोरे

चिमुकलीसाठी अविस्मरणीय ठरला प्रसंग

शिवरायांचा संस्कार... चिमुकलीच्या ओठांवर शिवपराक्रमाची गाथा... आणि महाराजांच्या घराण्यातील वारसाकडून मिळालेली प्रेमाची गोड भेट, या अनोख्या संगमामुळे हा प्रसंग चिमुकलीसाठी अविस्मरणीय ठरला. गाथा सादर करण्यापासून ते उदयनराजेंकडून मिळालेली गोड भेट स्वीकारण्यापर्यंतचा हा क्षण तिच्या आठवणीत कायमचा कोरला गेला.

satara
Satara News : बिबट्याबाबत अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याचा वनविभागाचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news