Koyna Dam : कोयना धरणात 70.96 टीएमसी पाणी, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 55 हजार 522 क्युसेक पाण्याची आवक
Koyna Dam Water Level
महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. Pudhari

कराड, पुढारी वृत्तसेवा : Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.24) सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा 70.96 टीएमसी इतका झाला होता. त्यापैकी 65.84 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 55 हजार 522 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यापैकी 1 हजार 50 क्युसेक पाणी धरणाच्या पायथा वीजगृहात वीज निर्मिती करून कोयना नदी पात्रात सोडले जात आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या 24 तासात कोयना येथे 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथे अनुक्रमे 106 व 91 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news