सातारा: गणपती विसर्जनानंतर एसटी बसेस फूल्ल; उंब्रज येथे प्रवाशांची मोठी गर्दी | पुढारी

सातारा: गणपती विसर्जनानंतर एसटी बसेस फूल्ल; उंब्रज येथे प्रवाशांची मोठी गर्दी

उंब्रज: पुढारी वृत्तसेवा :  पाच दिवसांच्या गौरी, गणपती विसर्जनानंतर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची पुणे- मुंबई महामार्गावरील उंब्रज येथे आज (दि.२४) मोठी गर्दी झाली होती. तीन -तीन तास प्रतीक्षा करूनही एसटी बस न मिळाल्याने प्रवाशांची दमछाक झाली. पुणे, मुंबईला जाणाऱ्या एसटी बसेसबरोबर खासगी वाहतूकही  फूल्ल असल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी किमान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा एसटी बसेसची सोय करणे गरजेचे होते, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात होती.

 

Back to top button