सातारा : खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात एसटीचा विसावा | पुढारी

सातारा : खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात एसटीचा विसावा

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी हल्याच्या निषेधार्थ कराड येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उंब्रजचे वाहतूक नियंत्रक यांनी पुणेहून कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. कराड येथे आज (दि. २) सकाळी मराठा आंदोलकांचा मोर्चा होता. याच पार्श्वभूमीवर कराड आगार व्यवस्थापक यांनी उंब्रज बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जी.डी.चव्हाण व महिला वाहतूक नियंत्रक एम.ए.पाटोळे यांना पुणे हून येणाऱ्या एसटी उंब्रज बसस्थानकात थांबविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

वाहतूक नियंत्रक चव्हाण व पाटोळे यांनी तात्काळ सूचनांची अंमलबजावणी करून उंब्रज पोलिसांच्या सहकार्याने महामार्गावरून कराड, कोल्हापूर दिशेकडे जाणाऱ्या सर्व एसटी उंब्रज बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आल्या. सुमारे अर्धा तास एसटी बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आल्या होत्या. कराड येथील मोर्चाचे वातावरण निवळल्यावर उंब्रज बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आलेल्या एसटी सोडण्यात आल्या. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाचे कराड आगाराचे वरीष्ठ अधिकारी यांच्या सुचनेवरून कराड कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी काही वेळासाठी उंब्रज बसस्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.
जी.व्ही.चव्हाण, वाहतूक नियंत्रक, उंब्रज

Back to top button