कृष्णा उद्योग समुहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन | पुढारी

कृष्णा उद्योग समुहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन

कराड : पुढारी वृत्तसेवा

कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि कृष्णा उद्योग समुहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

जयमाला जयवंतराव भोसले यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत कृष्णा हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी ठीक 12 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कुलच्या पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Back to top button