सातारा : ऐन पावसाळ्यात 6 गावे तहानलेलीच

पाणी टंचाईचे सावट; सात टँकरनी प्रशासनाकडून पाणीपुरवठा
Satara News
सात टँकरनी प्रशासनाकडून पाणीपुरवठाPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी 6 गावे व 22 वाड्यांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. गावांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पाणीपुरवठा विभागामार्फत 7 टँकरनी टंचाईग्रस्त गावांची तहान भागवली जात आहे.

Satara News
इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून

सातारा जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे 218 वर टँकरची संख्या पोहोचली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार वळवाच्या सरी कोसळल्या, तर जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली.

Satara News
पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

त्यामुळे आटलेले पाणी स्रोत पुन्हा खळाळू लागले. गावोगावी टँकरची मागणी कमी होऊ लागली. त्यानुसार प्रशासनाने गावात जाऊन पाण्याची सद्यःस्थिती पाहूनच टँकर बंद केले. सध्या माण तालुक्यातील वरकुटे कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव यासह 22 वाड्यावस्त्यांमधील 11 हजार नागरिकांना 7 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी काही ठिकाणी कूपनलिका अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा व कराड तालुक्यांत सुरू असलेले पाणी टँकर बंद केले असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news