सातारा: महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा | पुढारी

सातारा: महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर महाबळेश्वर महसूल विभाग व इतर प्रशासकीय अधिकारी खडबडून जागे झाले आहे. महाबळेश्वर, पाचगणी रस्त्यावरील वेण्णा लेक परिसरात दुतर्फा असणारी अतिक्रमणे आज (दि.७) काढण्यात आली. सकाळपासून वन विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग यासह इतर विभागाने थेट कारवाई सुरू केली.

जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी रुचेस जेवणसी यांनी दोन महिन्यापूर्वी महाबळेश्वर तालुक्यातील अतिक्रमणाबाबत ठोस निर्णय घेतले आहेत. निसर्गाचे लचके तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीम उघडली आहे. वेण्णा लेक परिसर वनविभागाच्या हद्दीत येतो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. आज सकाळपासून ही अतिक्रमणे काढण्यास सुरूवात झाली आहे.

बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यावरून काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली होती. मात्र, ज्यांनी अतिक्रमण काढली नाहीत. त्यांच्यावर थेट कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अतिक्रमण मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button