सातारा: शिवसागर जलाशय आटला; पूल, वास्तू, मंदिरे उघडी

सातारा : साई सावंत : कोयना धरणाच्या इतिहासातील भीषण दृश्य सध्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला निसर्ग सौंदर्याने नटलेला शिवसागर जलाशय आटला आहे. ब्रिटिश कालीन पूलदेखील दिसू लागले आहेत. तर धरणात जलसमाधी घेतलेल्या अनेक वास्तू, मंदिरे उघडी पडू लागली आहेत. परिणामी बोटिंग व्यवसाय ठप्प झाला आहे.
यावर्षाचा उन्हाळा अत्यंत कडक असल्याने त्याचा परिणाम विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांवर होत आहे. कोयना धरणाच्या जलाशयाने तळ गाठला आहे. शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. यामुळे बोटिंग व्यवसाय ठप्प झाला असून पर्यटन थांबल्याने हॉटेलिंग तसेच छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
शिवसागर जलाशय भरला म्हणजे येथील निसर्गसौंदर्याची उधळण पाहण्यासाठी दूरदूरवरुन पर्यटक या भागात येतात. हा भाग म्हणजे निसर्गाला पडलेलं अदभूत स्वप्न, असाच नेहमी दिसतो. पण, उन्हाळा आला की मात्र, येथील सौंदर्याला गालबोट लागते. कोरडा आणि भेगाळलेला शिवसागर पाहायला नको वाटत आहे.
हेही वाचा