सातारा : ग्रामसेवकाकडून विस्‍तार अधिकार्‍याने घेतली लाच | पुढारी

सातारा : ग्रामसेवकाकडून विस्‍तार अधिकार्‍याने घेतली लाच

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वडूज पंचायत समितीचा विस्‍तार अधिकारी संजय विलासराव सोनावले (सध्या रा.केसकर पेठ, सातारा. मूळ रा. पाली ता.कराड, सातारा) याने कारणे दाखवाची नोटीसच्या अनुषंगाने कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून १२ हजार रुपयांची लाच घेतली. वडूज पंचायत समितीच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडून कारवाई केली.

गुरुवारी दुपारी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताला एसीबी विभागाने अटक केली असून शासकीय नोकरीच्या ठिकाणी त्रास देवून पैसे उकळले जात असल्‍याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार ग्रामसेवक आहेत. तक्रारदार यांनी तक्रारीत म्‍हटले आहे की, संशयित विस्‍तार अधिकारी सोनावले हा पंचायत समितीच्या कामकाजामध्ये चुका काढून त्‍यांना मानसिक त्रास देत होता. तसेच वरिष्ठांना कसूरी अहवाल पाठवून निलंबित करु, अशा धमकीही देत होता. अशाच एका प्रकरणामध्ये तक्रारदार यांना विस्‍तार अधिकारी सोनावले याने कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसीमध्ये कारवाई न करण्यासाठी संशयित सोनावले याने लाचेची मागणी केली.

Back to top button