

कराड: पुढारी वृत्तसेवा दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच पित्याचा डोक्यात वार घालून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज (रविवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी संशयीताला ताब्यात घेतले आहे. शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय 70) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. तर अर्जुन शिवाजी पाटील (वय 36) असे संशयित मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जखिणवाडी (ता. कराड) येथे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामागे शिवाजी नलवडे-पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री अर्जुन पाटील याने दारूसाठी पैसे मागितले. मात्र वडिलांनी पैसे न दिल्याने चिडून जाऊन अर्जुनने वडीलांच्या डोक्यात पार घालून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी संशयित मुलगा अर्जुन पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :