सातारा : प्रवाशांना एसटीचा ‘जोर का झटका’ | पुढारी

सातारा : प्रवाशांना एसटीचा 'जोर का झटका'

तळमावले; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील दुर्गम त्रे भागातील लोकांना कराडमध्ये येण्यासाठी दरवाढीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये व प्रचंड नाराजी आहे. पूर्वी ढेबेवाडी ते कराड प्रवास भाडे ४० रुपये होते. न त्यामध्ये आता ५ रुपयांची वाढ करून क एस.टी. प्रशासनाने प्रवाशांना जोर का झटका दिला आहे.

ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना ते भाडेवाडीचा चटका सोसावा लागत आहे. ढेबेवाडी ते कराड प्रवास भाडे ४५ रुपये झाले आहे. तळमावले ते , कराड प्रवास भाडे ५ रुपयांनी वाढून ४० रुपये झाले आहे. कोल्हापूर न नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व गाड्या वारुंजी फाट्यावरील उड्डाण पुलाखालून पुन्हा कोल्हापूर नाक्यावर येवून बसस्थानकात जात आहेत.

हे अंतर वाढल्याचे खापर प्रवाशांच्या माथ्यावर तिकीट दर वाढवून लादण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे. पूर्वी होते तेवढे प्रवास दर करावेत, अशी मागणी विभागातील नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा कराड आगारातील एस.टी. बसेसच खूप वेळ चालू स्थितीत उभ्या असतात. त्यावेळी डिझेल जळत नाही काय, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे, हे नुकसान एस. टी. प्रशासनाला चालते. उड्डाणपुलाच्या कामामुळे एस.टी.ला थोडा वळसा घालून जावे लागत आहे, तर प्रवासी भाड्यात लगेचच वाढ करण्यात आली आहे. जेव्हा स्थानकावर एस.टी. बसेस सुरू करून ठेवल्या जातात तेव्हा होणाऱ्या नुकसानास संबंधित एस.टी. प्रशासनाला जबाबदार धरावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सामान्य प्रवाशांना पडलेला प्रश्न

ढेबेवाडीकडून कराडला येताना अथवा कराडकडून ढेबेवाडीला जाताना एस.टी. बसेस डिझेल भरण्यासाठी पाटण तिकाटण्यातील पंपावर जात होत्या. तेव्हा गाडीचे वाढलेले अंतर संबंधित एस.टी. प्रशासनाला कसे चालत होते? तेव्हा होणारे नुकसान कसे भरून काढले जात होते? मग थोडे अंतर वाढले तर प्रवाशांच्या खिशाला भाडेवाडीची कात्री का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

Back to top button