शिरंबेचा सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेचाच : अॅड. नितीन भोसले

शिरंबेचा सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेचाच : अॅड. नितीन भोसले

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोणी कितीही बॅनरबाजी करो, वा सोशल मीडियावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे बातम्या देवोत. पण शिरंबे गावाचा सरपंच व उपसरपंच हे दोघे ही राष्ट्रवादीचेचं आहेत. मतदान झाले त्या क्षणापासून गावं एकसंघ आहे, विरोधकांनी लोकांच्यात भ्रम पसरवण्याचे आणि खोटे बोलणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी युवक , काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांनी विरोधकांवर केली.

शिरंबे ता. कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी संघटना पुरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलमधून निवडून आलेल्या सौ. पदमा भोसले आणि उपसरपंचपद विक्रम गायकवाड यांचा आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. शिंदे यांनी शिरंबे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी शेतकरी संघटना अध्यक्ष संजय गायकवाड, माजी सरपंच सत्यवान भोसले, भिकाजी भोसले, नामदेव जाधव, आझाद मुलाणी, आबाजी भोसले, विक्रांत भोसले, सुनील घोरपडे, नामदेव गोडसे, संतोष भोसले, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, आकाश भोसले, सोपान भोसले, राजेंद्र गायकवाड संभाजी सकुंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news