सातारा : तिहेरी अपघातात खोजेवाडीचा दुचाकीस्वार ठार | पुढारी

सातारा : तिहेरी अपघातात खोजेवाडीचा दुचाकीस्वार ठार

वेणेगाव : पुढारी वृत्तसेवा : काशीळ, ता. सातारा येथील गावच्या पुणे-बेंगलोर महामार्गावर तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात खोजेवाडी (ता. सातारा) येथील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडला. अभिजित सर्जेराव पाटील (वय ३६, रा. खोजेवाडी ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरूंदवाड (शिरूर) डेपोची कुरुंदवाड-पुणे ही एसटी कराडहून साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. एसटी काशीळ गावच्या हद्दीत आली असताना पाठीमागून आलेल्या मालट्रकची एसटीला जोराची धडक बसली. या अपघातानंतर एसटी चालकाने एसटी थांबवून पाठीमागे येऊन पाहिले असता दोन्ही वाहनांच्यामध्ये एक मोटार सायकलस्वार अडकल्याचे दिसून आले.

या मालट्रकने धडक देऊन अभिजीत पाटील यांना गंभीर जखमी केले होते. त्यास जमलेल्या लोकांनी रूग्णवाहीकेतुन उपचारासाठी सातारा येथे पाठवले. परंतू रूग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद एस. टी. चालक महेश कांबळे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय देसाई व हवालदार प्रकाश वाघ करत आहेत.

Back to top button