सातारा : विलासपूरसाठी सव्वा दोन कोटींचा निधी | पुढारी

सातारा : विलासपूरसाठी सव्वा दोन कोटींचा निधी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा हद्दवाढ भागातील विलासपूर येथील फॉरेस्ट कॉलनी अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण व आरसीसी गटर बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे हा निधी मिळाला आहे. नव्याने झालेल्या प्रभाग क्र. 17 मधील सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या पाठपुराव्यामुळे ही विकासकामे मार्गी लागत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

‘नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत सातारा नगरपालिकेला 2 कोटी 25 लाखांचा निधी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याकडून वितरित करण्यात आला आहे. हा निधी विलासपूर येथील फॉरेस्ट कॉलनी अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण व आर. सी. सी. गटर बांधकामासाठी देण्यात आला आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर या भागात पायाभूत सुविधा नागरिकांना मिळत नसल्यामुळे तक्रारी वाढलेल्या होत्या. विकास कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याने आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनी निधीसाठी पाठपुरावा सुरु केला होता. फिरोज पठाण यांच्या मागणीची दखल घेवून नगर विकास खात्याने रस्ते खडीकरण, डांबरीकरण व आरसीसी गटर यासाठी 2 कोटी 25 लाखांचा निधी वितरित केला. फिरोज पठाण यांच्या प्रयत्नांना यश आले. रस्त्याचे काम होणार असल्याने विलासपूर, गोळीबार मैदान पसिरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. फिरोज पठाण यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button