कराड तालुक्यात ११ ग्रामपंचायती बिनविरोध; ३३ ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची लढत | पुढारी

कराड तालुक्यात ११ ग्रामपंचायती बिनविरोध; ३३ ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची लढत

कराड : पुढारी वृत्तसेवा : कराड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जेवढी सदस्य संख्या तेवढेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. ३३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

दरम्यान, चोरजवाडी ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. मात्र सरपंच पदासाठी येथे निवडणूक लागली आहे. कालगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले. मात्र, सदस्यांची निवडणूक लागली आहे. गणेशवाडी ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध, ६ सदस्यही बिनविरोध मात्र एका सदस्य पदासाठी येथे निवडणूक लागली आहे. डेळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल नसल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

कराड तालुक्यातील हनुमानवाडी, जुने कवठे, वनवासमाची खोडशी, विजयनगर, हवेलवाडी, जोडोसी, धारवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, तारुख, वानरवाडी, दुशेरे, गोंदी, हिंगणोळे, साबळवाडी, चिंचणी, घोलपवाडी, अंतवडी, शामगाव, मस्करवाडी, भांबे, आरेवाडी, डेळेवाडी, आणे, कुसूर, अंधारवाडी, कळंत्रेवाडी, कालगाव, मनू, कोरेगाव, गणेशवाडी, पश्चिम सुपने, रेठरे खुर्द, जुळेवाडी, कासार शिरंबे, सुपने, किवळ, येळगाव, आटके, चरेगाव, तळबीड, वडगाव हवेली या ४४ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली होती. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

यामध्ये हवेलवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, गोंदी, साबळवाडी, चिंचणी, मस्करवाडी, भांबे, आरेवाडी, अंधारवाडी, कळंत्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर सरपंच पदाचे १९० व सदस्य पदासाठी १०१४ अर्ज वैध ठरले ठरले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या ८९ उमेदवारांनी माघार घेतली तर सदस्यांमध्ये ३०३ सदस्यांनी माघार घेतली. निवडणुकीच्या अनुषंगाने गावागावात बैठकांचे सत्र सुरू आहे. काठावर कोणते मतदार आहेत? बाहेरगावी किती मतदार आहेत? याची माहिती काढली जात आहे. मतदार याद्या समोर घेऊन प्रत्येक मतदाराचा अभ्यास सुरू झाला आहे. सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्याचे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.

सरपंच बिनविरोध तर काही ठिकाणी सदस्य बिनविरोध

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. काही ग्रामपंचायतींचे सदस्य बिनविरोध झाले; मात्र सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये चोरजवाडी ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. मात्र, सरपंच पदासाठी येथे निवडणूक लागली आहे. कालगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले. मात्र सदस्यांची निवडणूक लागली आहे. गणेशवाडी ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध, ६ सदस्यही बिनविरोध मात्र एका सदस्य पदासाठी येथे निवडणूक लागली आहे. डेळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल नसल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती

बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामध्ये हवेलवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, गोंदी, साबळवाडी, चिंचणी, मस्करवाडी, भांबे, आरेवाडी, अंधारवाडी, कळंत्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Back to top button