राज्यपाल बदलासाठी उदयनराजेंनी दिल्लीत जावं : आ. शिवेंद्रराजेंचा सल्ला | पुढारी

राज्यपाल बदलासाठी उदयनराजेंनी दिल्लीत जावं : आ. शिवेंद्रराजेंचा सल्ला

सातारा : पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हा राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. मात्र राज्यपाल बदलायचा असेल तर केंद्रात दिल्लीत जावून बसावं लागतं. उदयनराजेंनी राज्यात दंगा, आंदोलन करण्यापेक्षा दिल्लीत जावं, असा सल्ला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. राजकारण, समाजकारणात पेशन्स ठेवावे लागतात. नेतृत्वावर विश्वास ठेवायचा असतो. राज्यपालांविरोधात सुरु राजकीय स्वार्थ आहे का ते पहावे. लागेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

`राज्यात राज्यपालांमुळे वाद सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती घराण्याबद्दल नितांत आदर आहे. ते संबंधितांना समज देतील. राज्यपाल बदलण्याचे अधिकार राज्य शासनाकडे नाहीत. त्यासाठी केंद्रातून, दिल्लीतून निर्णय व्हायला हवा. जे आंदोलन करतायत त्यांनी दिल्लीत जावून बसावं. त्यांना दिल्लीला जाण्यापासून कोणी अडवले आहे काय? राज्यपाल बदलाच्या हालचाली त्यांनी दिल्लीत बसून कराव्यात. इथे दंगा कवा आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय राज्यात होवू शकतो. राज्यपाल बदलण्यासाठी त्यांनी दिल्लीत जावून बसावे, असा सल्ला त्यांनी नाव न घेता खा. उदयनराजे यांना दिला.

उदयनराजे यांच्या आंदोलनात आपण दिसला नाही, असे विचारले असता, आ. शिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजेंचे आंदोलन हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अवमानप्रकरणी आम्ही निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो, स्वतः चा राजकीय स्वार्थ साध्य होत नसेल तर प्रेशर टॅक्टीज असं राजकारण आपल्याला जमलं नाही. राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात लगावला. काम करताना पेशन्स ठेवायला लागतात. काही गोष्टी ऐकल्या न गेल्यास वेगळ्या भूमिका निर्माण केल्या जात असाव्यात. उदयनराजेंच्या राजकारणाची पध्दत त्यांनाच विचारायला हवी, त्यांनी कोणती दिशा धरली आहे हे माहीत नाही, असा टोलाही आ. शिवेंद्रराजे यांनी लगावला.

शिवाजी महाराजांचा रावसाहेब दानवे यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सर्वच महापुरुषांचा आदर राखला पाहिजे. पाहिजे. एकेरी उल्लेख करणे किंवा अन्य पध्दतीने महापुरुषांचा अवमान करणे, इतिहासाची मोडतोड करणे हे प्रकार थांबले पाहिजेत. पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याचे भान ठेवून बोलावे. लोकांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.

घरपट्टीबाबत यापूर्वीच का भूमिका नाही; आम्ही बोलल्यानंतरच त्यांना जाग आली

अवाजवी घरपट्टी आकारणी केली जाणार नसल्याचे पत्रक खा. उदयनराजे यांनी काढले आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा पालिकेत घरपट्टीसंदर्भात निवेदन द्यायला आम्ही येणार असल्याचे समजल्यावर सातारा विकास आघाडीचे नेते जागे झाले. इतके दिवस तुम्ही काय करत होता? प्रशासक आला म्हणजे सत्तारूढ आघाडीची जबाबदारी संपली का? पाच वर्षे सत्ता भोगली. ऐटीत येवून खुर्चीत बसणारे सगळे पदाधिकारी आता कुठे गेले? टेंडर निघाले की त्यांचा विषय येतो का? बिल उदयनराजे यांच्या आंदोलनात काढतानाच त्यांचा सातारा शहराशी संबंध येतो का? इतर वेळी हे पदाधिकारी कुठे जातात? मुख्याधिकाऱ्यांना घरपट्टीसंदर्भात भेटणार असल्याचे समजल्यावर उदयनराजेंनी पत्रक काढून माध्यमांना पाठवून दिले, ही वस्तुस्थिती आहे.

घरपट्टीचा विषय काल सुरु झालेला नाही. इतके दिवस काय करत होता? टेंडरसाठी, बिलासाठी सीओंना पुण्यापर्यंत चर्चेसाठी बोलावलं जातं. घरपट्टीवर चर्चा करायला सीओंना का नाही बोलावलं? तुम्ही नगरपालिकेत का नाही आलात? टेंडर कुणाला द्यायचे यावर चर्चा करायला बोलावून घेतले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

 

Back to top button