अबब… एकरी १२८ टन उसाचे उत्पादन | पुढारी

अबब... एकरी १२८ टन उसाचे उत्पादन

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा: एकरी १२८ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेत आदर्श व फायदेशीर शेतीचा आदर्श घालून दिला आहे. शेणे (ता. वाळवा) येथील पंकज काकासो आडके या प्रगतिशील शेतकऱ्याने हे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

पंकज आडके यांनी गतवर्षीही एकरी शंभर टनाच्या पुढे उत्पादन घेतले होते. यावर्षीही त्यांनी एकरी १२८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. या युवक शेतकऱ्याने शेणे: पंकज आडके यांनी उसाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. सलग दुसऱ्या वर्षी एकरी १०० टना पेक्षा जास्त उत्पादन घेऊन शेतीची यशस्वीता तरुणाईपुढे मांडली आहे.

सदर उसाचे गाळप राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिट नं. २ येथे झाले. या कार्यात त्यांना कासेगाव (ता. वाळवा) येथील सागर कृषी उद्योग समूहाचे संचालक निवास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदरच्या २६ गुंठे क्षेत्रात ८६०३२ या उसाची लावण, १७ मे २०२१ रोजी पट्टा पद्धतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उसाला सरासरी ४५ ते ५० कांड्या आल्या. या क्षेत्रात उसाचे एकूण ८३ टन इतके उत्पादन मिळाले. एकूण ऊस पिकाच्या कालावधीत वेळोवेळी प्रतीक इंडस्ट्रीजची सेंद्रिय खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरली. त्याचबरोबर विद्राव्य खतांचा ठिबक मधून वापर केल्याचे पंकज आडके यांनी आवर्जून सांगितले.

पंकज आडके यांच्या या यशातून नवयुवक शेतकरी व तरूणाईने प्रेरणा घेऊन, असे यशस्वी प्रयोग आपल्या शेतात राबविले पाहिजेत. आडके यांचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक देवराज पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button