सातारा : तळीये फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

सातारा : तळीये फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

पिंपोडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : सातारा-लोणंद रस्त्यावर तळीये येथे शनिवारी फाटा दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ठार झाल्याची घटना घडली. करण उर्फ अल्केश विलास चव्हाण (वय २२, रा. अंबवडे सं.कोरेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

चव्हाण हा मोटारसायकल क्रमांक ११ सीएस. ४८७८ वरून सातारा-लोणंद रस्त्यावरून प्रवास करत असताना रात्री दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत करण हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने धडक देणारा वाहन चालक पसार झाला. याबाबत भगवान विठ्ठल चव्हाण यांनी शनिवारी रात्री उशिरा करण वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news