सातारा : जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरूच | पुढारी

सातारा : जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरूच

सातारा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा चालू केला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सातारा शहर परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही जुगार अड्ड्यांवर धाडसत्र कायम राहिली असून पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागेवाडी ता. सातारा येथे जुगार प्रकरणी महादेव नाटेकर, निलकंठ शिवाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करुन 19 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरबझार येथील कारवाईत शरद नागू जाधव, हरिश्चंद्र सरनाप्पा नाटेकर, समीर सलीम कच्छी यांच्यावर गुन्हा दाखल करुन संशयितांकडून 2 हजार 32 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातार्‍यातील क्षेत्रमाहुली व एमआयडीसी परिसरातील कारवाईत अजय संतोष खंडजोडे, विनोद आनंदराव भोसले, विनायक राहुल कसबे, शशिकांत सिद्राम चव्हाण, उदय सिताराम निगडे, अल्लाबक्ष हाजीफ जमादार, रवी प्रकाश सोनावणे यांच्यावर गुन्हे दाखल करुन 12 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गत काही दिवसांत जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 60 हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 2 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे जुगार अड्डे चालक व खेळणार्‍यांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतला आहे.

Back to top button