सातारा : भादेत विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

सातारा : भादेत विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

शिरवळ : पुढारी वृत्तसेवा : भादे, ता. खंडाळा येथे विहिरीवर पाय धुण्याकरता गेलेल्या युवकाचा पाय घसरून पाण्यात पडून बूडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. किरण शंकर जाधव असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

भादे गावातील थोरला मळा परिसरातील रस्त्याने फिरण जात असताना चिखलाने पाय खराब झाल्यामुळे शेजारी असलेल्या विहिरीवर पाय धुण्यासाठी गेला. यावेळी किरणला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून पाण्यात पडला. शिरवळ रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेसातच्या सुमारास किरणचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

Back to top button