वाईत दहीहंडीचा थरार | पुढारी

वाईत दहीहंडीचा थरार

वाई : पुढारी वृत्तसेवा वाई शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडीचा थरार पहायला मिळाला. सोनगीरवाडीतील मावळा प्रतिष्ठानने बांधलेल्या दहीहंडीवर 55,555 रु बक्षीस ठेवून सर्वांत उंच दहीहंडी बांधण्याचा मान मिळवला. ही दहीहंडी सिद्धनाथवाडी, बारामती व शिरवळ येथील मंडळांनी फोडली. वाई शहरातील सर्व दहीहंडी फोडण्याचा मान सिद्धनाथवाडीकरांना गेली पन्नास वर्षे आहे. गेल्या काही वर्षांपसून तालुक्याबाहेरील गोविंदा पथके सहभाग नोंदवत आहेत. रविवार पेठेतील ढोर गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून किरवे ओढ्यात पाण्यात दहीहंडी बांधून आपली परंपरा कायम ठेवली.

वाई शहरातील विविध ठिकाणची दहीहंडी फोडून पन्नास हजारांपेक्षा जास्त इनाम सिद्धनाथवाडीतील गोविंदा पथकाने कमवले आहे. किसनवीर चौकातील मानाची व वाईतील शेवटची दहीहंडी रात्री साडेदहा वाजता फोडण्यात आली. रविवार पेठेतील मंडळे हे काही वर्षांपासून स्वतःच्या परिसरातील दहीहंडी स्वतःच फोडतात ही प्रथा सध्या रूढ होवू पहात आहे. आ. मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चरण गायकवाड, माजी उपसभापती मदन भोसले, नितीन जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक रवींद्र तेलतुंबडे लालासाहेब शिंगटे, आप्पासाहेब मालुसरे, रवी बोडके, बापू भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button