प्रतापगडावरील ध्वज बुरुजावर फडकावला तिरंगा | पुढारी

प्रतापगडावरील ध्वज बुरुजावर फडकावला तिरंगा

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : किल्ले प्रतापगडावर ‘आझादी का अमृत महोत्सव’ याचे औचित्य साधून किल्ले प्रतापगडावरील मुख्य आकर्षण असलेल्या ध्वज बुरुजावर १५ फुट बाय १० फुटांचा भला मोठा राष्ट्रध्वज फडकावण्यात  आला. यावेळी महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी राजमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूरचे सदस्य तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रकांत उतेकर यांची होती. या कार्यक्रमासाठी पर्यटकांसह ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास मोरे, आनंद उतेकर, विलास जाधव, ग्रामसेवक चिटकुळ बबन, कासुर्डे सर्कलचे खटावकर उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button