फलटण : सांगवी येथे शिवीगाळ, मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

फलटण : सांगवी येथे शिवीगाळ, मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

फलटण : पुढारी वृत्तसेवा सांगवी, ता. फलटण येथे जमिनीच्या वादावरून जातिवाचक शिवीगाळ व संगनमताने मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती व नितीन नानासो रणदिवे (रा. सांगवी ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रणदिवे हे गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडे जात असताना मराठी शाळेजवळ शरद सुभाष जगताप व मच्छिंद्र नारायण निकम (दोघे रा.

सांगवी ता. फलटण) यांनी जातिवाचक शिव्या देवून जिवंत मारण्याची धमकी दिली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे करत आहेत. दुसरी फिर्याद मच्छिंद्र नारायण निकम (रा. सांगवी ता. फलटण) यांनी दिली असून यामध्ये नितीन नानासो, सुलिंदर केशव रणदिवे, गणेश बबन, उमेश बबन रणदिवे, दत्तात्रय सर्जेराव रणदिवे (सर्व रा. सांगवी) यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. तसेच मारहाण करताना फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांचा मित्र शरद सुभाष जगताप यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओढून तोडून नुकसान केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तपास सहायक फौजदार शिंदे करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news