लब्बाला एक दिवसाची कोठडी | पुढारी

लब्बाला एक दिवसाची कोठडी

सातारा : पुढारी वृत्तसेवा कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्के प्रमाणे 92 हजार रुपयांची लाच मागून मागून ती लाच स्वीकारल्याप्रकरणी सतीश लब्बा या पाटबंधारेच्या क्‍लास 1 अधिकार्‍याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून एसीबी विभागाने त्याच्या घरावर छापे टाकले आहेत.

सतीश पंचाप्पा लब्बा (वय 48, सध्या रा.सदरबझार, सातारा मूळ रा.सिध्देश्‍वर पेठ, सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून तो जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अर्थात पाटबंधारेचा (वर्ग 1) अधिकारी आहे. या प्रकरणातील तक्रारदार 54 वर्षीय कंत्राटदार आहे. मंगळवारी दुपारी सतीश लब्बा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 92 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशीरा त्याला अटक केली.

बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर बचाव व सरकार पक्षाचा न्यायालयात जोरदार युक्‍तिवाद झाला. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह विविध मुद्यांचा तपास करायचा असल्याचा सरकार पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी लब्बाला 1 दिवसाची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, मंगळवारी दुपारी ट्रॅप झाल्यानंतर रात्री उशीरा सातारा व सोलापूर येथील लब्बाच्या घरावर एसीबी विभागाने छापे टाकले. संपत्तीबाबतची माहिती संकलीत केली जात असून त्याबाबतची माहिती घेतली जात असल्याचे एसीबी विभागाने सांगितले.

Back to top button