सातारा : देवदर्शनासाठी निघालेले दाम्पत्य ठार | पुढारी

सातारा : देवदर्शनासाठी निघालेले दाम्पत्य ठार

नागठाणे : पुढारी वृत्तसेवा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सहा च्या सुमारास नागठाणे येथे घणसोली- मुंबई येथून कोल्हापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर एका चिमुरडीसह चौघे जखमी झाले आहेत. धोंडिबा केशव साळुंखे (वय 67) व पत्नी लक्ष्मी धोंडिबा साळुंखे (वय 61, सध्या रा. घणसोली, मुंबई, मूळ रा. ढेबेवाडी, ता. पाटण) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे, तर चालक मच्छिंद्र किसन जाधव (वय 34), तनुजा मच्छिंद्र जाधव (वय 32), तनुज मच्छिंद्र जाधव (वय 2, सर्व रा. कोपरखैरणे, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

धोंडिबा साळुंखे हे पत्नी लक्ष्मी व नातेवाईकांसह शष्टी निमित्त देवदर्शनासाठी कोल्हापूर येथे निघाले होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे आल्यानंतर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात धोंडिबा साळुंखे व लक्ष्मी साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकीचे चौघे जखमी झाले. अपघातानंतर सर्वत्र काचांचा सडा पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे स.पो. नि.चेतन मछले, हावलदार प्रकाश वाघ, संतोष चव्हाण,अझीम सुतार, सुहेल सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील जखमींना पोलिसांनी तातडीने रूग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Back to top button