सातारा : लग्‍न कुंडलीप्रमाणेच आरोग्य कुंडली महत्त्वाची

सातारा : लग्‍न कुंडलीप्रमाणेच आरोग्य कुंडली महत्त्वाची
Published on
Updated on

सातारा; मीना शिंदे : लग्‍न जुळवताना लग्‍न कुंडली व किती गुण जुळतात हे पाहिले जाते. लग्‍नामुळे दोन कुटुंब एकत्र येत असून, त्यामधील मागच्या पिढीतील अनेक आजारांचा वारसा पुढच्या पिढीला मिळत आहे. नात्यातील लग्‍नामुळे व्यंगत्वाचा धोका संभवतो. जुळते का हे पाहण्याबरोबरच मुला-मुलींची आरोग्य कुंडली पाहिल्यास पुढच्या पिढीतील आनुवंशिक आजार व व्यंगत्व टाळणे शक्य होईल.

लग्‍न जुळवताना मुला-मुलीची कुंडली जुळते का? गुण जुळतात का? हे पाहिले जाते. कुंडली व गुण जुळल्यास पुढचे सोपस्कार पार पडतात. मुलगा पाहताना त्या मुलाची संपत्ती, घर, गाडी, नोकरी यालाच महत्त्व दिले जाते. एवढं सगळं जुळून आल्यावरच लग्‍नाचा योग जुळवला जातो. तरीदेखील

अशा लग्‍नानंतर या पती-पत्नींमध्ये मूल न होणे, झाल्यास त्यात दोष किंवा व्यंग असणे असे कटू अनुभव येतात. बर्‍याचदा त्यातून घटस्फोटालाही सामोरे जावे लागते. लग्‍न संस्कारामध्ये दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंब एकत्र येतात. या कुटुंबातील पहिल्या पिढीतील मधुमेह, उच्चरक्‍तदाब, ह्रदयविकार, फीटस् असे आजार आनुवंशिकतेने पुढच्या पिढीत जनुकांबरोबरच संक्रमित होतात. लहान मुलांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब असे आजार आढळल्याचे कारणही हेच आहे. आत्याच्या, मामाच्या मुलगा, मुलगीचे असे नात्यातील लग्‍नामुळेही पुढच्या पिढीत जन्मलेल्या बाळामध्ये डोळ्यात बुबुळच नसणे, डोक्याच्या कवटीची पूर्ण वाढ न होणे, एखादा मणका नसणे, मूकबधिरता आदी व्यंगत्व निर्माण होते. काही वेळा गतिमंद किंवा मतिमंद बाळ जन्मते. मात्र, गर्भात असताना सोनोग्राफीमध्ये त्याचे निदान होत नाही. मग त्या विशेष बालकाच्या संगोपनात अडचणी येतात. समाजाची हेटाळणी या बालकांच्या नशिबी येते. लग्‍न जुळवताना आरोग्य कुंडली पाहिल्यास आनुवंशिक आजार टाळणे शक्य होईल. बर्‍याचदा चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार जडतात. तेच पुढच्या पिढीत संक्रमित होतात.

रक्‍तगट व एचआयव्ही टेस्ट आवश्यकच

विज्ञान युगात वावरत असल्याने रक्तगटास शुगर, क्रिएटीन, एचआयव्हीसह विविध टेस्ट करणे यात वावगे काही नाही. लग्‍नानंतर त्या उभयतांपैकी आई किंवा बाबाचा रक्तगट निगेटिव्ह असल्यास त्यांच्या बाळाला जन्मताच काविळीचा धोका संभवतो. बर्‍याचदा लग्‍नानंतर एचआव्हीग्रस्त असल्याचे समोर आल्यास जोडीदार हादरुन जातो व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले जाते. या पार्श्‍वभूमीवर रक्तगट व एचआयव्हीसह विविध टेस्टची आवश्यकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news