तळमावले चौकातील खड्डयामुळे अपघात | पुढारी

तळमावले चौकातील खड्डयामुळे अपघात

तळमावले : पुढारी वृत्तसेवा पाटण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून तळमावले बाजारपेठेचे नाव घेतले जाते. कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील मोठी बाजारपेठ म्हणून तळमावलेचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र चौकामध्ये मोठा खड्डो पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहन खड्डयांत जाऊन अपघात घडत आहेत. येथे छोटेमोठे अपघात नेहमी घडत असतात. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी तो खड्डा भरावा अशी मागणी वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी केली आहे. चौकातील तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. .

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष घालून तो खड्डा बुजविणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तळमावले येथे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नागरिक येत असतात. नेहमी ही बाजारपेठ गर्दीने फुललेली असते वाहनांची सारखी वर्दळ असते आणि ज्या ठिकाणी हा मोठा खड्डा पडला आहे तो तळमावलेचा प्रमुख चौक आहे येथून कुंभारगाव विभागामध्ये तसेच गलमेवाडी व उंडाळे भागात जाण्यासाठी त्या रस्त्याचा उपयोग होतो त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते तेथून जाणारी वाहने त्या खड्ड्यात मोठ्याने आदळत आहेत त्यामुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे.

कुंभारगाव विभागातून येणारी वाहने तीव्र उतार असल्याने सुसाट येत आहेत त्यामुळे अचानक समोर खड्डा पाहून वाहनचालकांची भांबावून जात आहेत तरी मोठा अपघात घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तो खड्डा भरावा अशी मागणी होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून वाहनधारकांचे हाल सुरू असून बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतली आहे.

तळमावले चौकातील मोठा खड्डा न भरल्यास त्या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे बांधकाम विभाने त्वरीत खड्डा भरणे आवश्यक आहे. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.
– दीपक मुळगावकर,
मनसे अध्यक्ष ढेबेवाडी विभाग

Back to top button