कराड : प्लास्टिक मुक्‍तीसाठी कराडात जनजागृती | पुढारी

कराड : प्लास्टिक मुक्‍तीसाठी कराडात जनजागृती

कराड; पुढारी वृत्तसेवा :  ‘पेपर बॅग डे’ निमित्त रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली.

नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी यासाठी जागतिक ‘पेपर बॅग डे’ साजरा केला जातो. कराड रोटरी क्लब ऑफ कराड प्लॅस्टिक बॅग मुक्त दिनाचे औचित्त साधून कराड शहर व परिसरामध्ये फळविक्रेते स्टॉलला भेटी दिल्या. त्यांच्यामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी किंवा कागदी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे सर्व फळविक्रेत्यांना कागदी पिशव्याही मोफत वाटण्यात आल्या.

याप्रसंगी रोटरी क्लब कराडचे प्रेसिडेंट प्रबोध पुरोहित यांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी प्रोजेक्ट चेअरमन अशोक इंगळे, राजेश खराडे, राजेंद्र कुंडले, बद्रीनाथ धस्के, शिवराज माने, चंद्रकुमार डांगे, गजानन माने, रामचंद्र लाखोले, अभिजित चाफेकर व दत्ता कलबुर्गी, नागरिक उपस्थित होते.

Back to top button