सातारा : पत्नीच्या दुचाकीची पतीकडून चोरी | पुढारी

सातारा : पत्नीच्या दुचाकीची पतीकडून चोरी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मोळाचा ओढा परिसरात राहणार्‍या पत्नीची दुचाकी तिचा पती प्रशांत सर्जेराव कीर्तीकुडाव (रा. कोडोली, सातारा) व त्याच्या साथीदाराने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निकिता प्रशांत कीर्तीकुडाव यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. निकिता या गेल्या काही दिवसांपासून मोळाचा ओढा परिसरात भाड्याने राहण्यास आहेत. दिनांक 15 रोजी दुपारी पती प्रशांत हा तिथे आला व त्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर निकिता यांनी फिर्याद दिली.

Back to top button