कराडमध्ये रंगणार ‘रंग चैत्राचे’; उपस्थित पहिल्या चारशे महिलांना गिफ्ट | पुढारी

कराडमध्ये रंगणार ‘रंग चैत्राचे’; उपस्थित पहिल्या चारशे महिलांना गिफ्ट

कराड : पुढारी वृत्तसेवा

चैत्र महिना म्हणजे वसंतोत्सव. झाडा वेलींवर येणारी पालवी, जवळूनच ऐकू येणारी कोकिळेची कुहूकुहू तर कुठे लेकुरवाळा फणस. जंगलातील काळ्या मैनेचा मेवा. अशा या सुगंधी रम्य वातावरणात साजरे होते ते चैत्राचे हळदीकुंकू. आजही कालमानानुसार बदलत्या स्वरूपात का होईना पण काही प्रथांचे पालन केले जाते आणि म्हणूनच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी वहिनी तर्फे ‘रंग चैत्राचे’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. 11 मे रोजी दुपारी 3 वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमांमध्ये हळदीकुंकू सोबत प्रल्हाद विक्रम प्रस्तुत धमाल गाणी, स्पॉट गेम्समधून बक्षिसे जिंकण्याची संधी आणि आपल्या आवडत्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मधील राज आणि कावेरी यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी कराडमधील महिलांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी लाल, हिरवा किंवा पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून हजर रहावे. कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. कस्तुरी सभासद आणि मैत्रिणींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क  ; 8796471210, 9096853977.

उपस्थित पहिल्या चारशे महिलांना गिफ्ट

कार्यक्रम कस्तुरीच्या सभासदांसह इतर सर्व महिलांसाठी खुला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार्‍या पहिल्या 400 महिलांना हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे.

Back to top button