लोणंद : ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून राडा; दोन गटातील 19 जणांवर गुन्हा | पुढारी

लोणंद : ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून राडा; दोन गटातील 19 जणांवर गुन्हा

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : तांबवे ता. फलटण येथील गावाच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रात नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल होवून 19 जणांवर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर राजेंद्र शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑर्केस्ट्रादरम्यान नाचण्यावरून झालेल्या गोंधळात ऋषिकेश अनिल जगताप याने गावाला शिवीगाळ केली म्हणून जाब विचारला असता सागर पवार, आबासो शिंदे, के. एम. वशिंदे , महेंद्र शिंदे, गजानन शिंदे, सुभाष शिंदे, रोहित शिंदे, अमित शिंदे, अनिकेत शिंदे, ओंकार शिंदे, पंकज मांढरे, अभिजीत शिंदे (सर्व रा. तांबवे ता. फलटण) यांनी सागर यांच्यासह 8 जणांना मारहाण केल्याचे म्हटले आहे.

याच प्रकरणात आबासाहेब शिंदे यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, सागर शिंदे व ऋषिकेश जगताप हे ऑर्केस्ट्रा चालू असताना नाचत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे स्वत: आबासाहेब शिंदे व सागर पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता विशाल शिंदे यांनी आबासाहेब यांना मारहाण केली.

याचवेळी रोहित शिंदे, प्रदीप शिंदे, सागर शिंदे, राहुल शिंदे, अक्षय शिंदे, वैभव शिंदे, धनंजय शिंदे यांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.

Back to top button