Karad : ओगलेवाडीत औंधे बेकरीस आग

Karad : ओगलेवाडीत औंधे बेकरीस आग

Published on

कोपर्डे हवेली; पुढारी वृत्तसेवा : ओगलेवाडी ता. कराड येथे बुधवारी दुपारी औंधे बेकरीस अचानक आग लागून रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. ओगलेवाडी येथे मुख्य चौकात रमेश औंधे यांचे मालकीचे औंधे बेकर्स नावाने दुकान आहे. बुधवारी रमेश औंधे त्यांच्या कुटुंबासमवेत भाच्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी परगावी गेले होते. त्यामुळे दुकान दिवसभर बंद होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दुकानातून अचानक धूर येत असल्याचे अजुबाजुच्या लोकांच्या लक्षात आले. बघता बघता दुकानातून आगिचे आणि धुराचे लोट बाहेर येऊ लागले.

दुकानाला कुलूप असल्याने आग विझविण्यासाठी लोकांना अडचण येत होती. काही काळातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात आली परंतु तोपर्यंत दुकानातील बेकरीचे साहित्य, डिपफ्रिजर रोख एकोणीस हजार रुपये रोख रकमेसह जवळपास तीन लाखांचे नुकसान खाक झाले. घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news