मेढा : न्यायालयात दावा दाखल केला म्हणून आई व मुलीला मारहाण | पुढारी

मेढा : न्यायालयात दावा दाखल केला म्हणून आई व मुलीला मारहाण

मेढा; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयात दावा दाखल केल्याच्या रागातून श्रीमती कुंदा सोपान वांगडे, हिना कपील नायक यांना पिंपरी (मेढा) येथील कौस्तुभ पेट्रोल पंपाचे मालक नामदेव (बापू) वांगडे आणि त्यांचा मेव्हणा सुहास सावंत यांनी मारहाण केली. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून जिवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे श्रीमती कुंदा वांगडे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुळ पिंपरी (मेढा) येथील वांगडे कुटुंब राधिका रोड, सातारा येथे वास्तव्यास आहे. तीन भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार असून सातारा, जावली, मुंबई येथे त्यांचे व्यवसाय, मालमत्ता आहेत.

मात्र, यातील सोपान वांगडे या मानसिक आजारी असलेल्या भावाला मालमत्तेतील हिस्सा न दिल्याने दोन भावांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याची पत्नी कुंदा वांगडे हिला अंधारात ठेवून परस्पर मालमत्ता स्वतः, पत्नी, मुले यांच्या नावावर करून घेतली. यातून कै. सोपान वांगडे यांच्या पत्नी कुंदा, अविवाहीत मुलगी धनश्री वांगडे यांचे उदरनिर्वाहासाठीचे सर्व मार्ग बंद केले. यातून सुरू झालेला वाद पोलीस आणि न्यायालयात दावा दाखल करण्यापर्यंत पोहोचला.

हा वाद मिटवण्यासाठी संबंधित लोकांची बिभवी येथील कौस्तुभ पेट्रोल पंपाचे मालक नामदेव वांगडे यांनी पंपावर बैठक बोलावली होती.
यावेळी नामदेव वांगडे यांचा मेव्हणा सुहास सावंत याचा बैठकीशी काही संबंध नसताना ‘माझ्या दाजींच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला, तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत कुंदा वांगडे, त्यांची विवाहीत मुलगी हिना नायर या दोघींना शिवीगाळ करत मारहाण केली.

Back to top button