चिमुरडीच्या यशस्वी ट्रेकिंगमुळे सातार्‍याचे नाव साहसाच्या शिखरावर | पुढारी

चिमुरडीच्या यशस्वी ट्रेकिंगमुळे सातार्‍याचे नाव साहसाच्या शिखरावर

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : येथील साडेचार वर्षांच्या नतालियाने तुंगनाथ आणि देवरिया ताल, उत्तराखंडचा ट्रेक स्वबळावर यशस्वीपणे पूर्ण केला. तिच्या या साहसामुळे सातार्‍याचे नाव साहसाच्या शिखरावर पोहचले.

नतालीया ही सातार्‍यातील मोना स्कूलची विद्यार्थिनी असून एलकेजीमध्ये शिकत आहे. तिचे वडिल माधव भोईर व आई चित्कला दोशी निसर्गप्रेमी असल्याने हा अवघड ट्रेक पूर्ण केला. उत्तराखंड येथील तुंगनाथ मंदिराची उंची 12,073 फूट असून जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. तुंगनाथ ट्रेक खडतर असूनही उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असते. तरीदेखील चढाईतील चिकाटी आणि ट्रेकींगचा नियमित सराव यामुळे नतालीयाने हा ट्रेक स्वबळावर यशस्वीपणे पूर्ण केला. एवढ्या कमी वयात ट्रेकिंगची आवड व कुवत पाहून अनेकांना तिने आश्चर्यचकित केले आहे. पर्वत आणि बर्फाच्या प्रेमापोटी केलेला हा साहसी प्रवास व तिच्या अनुभवाबद्दल बोलताना छोटी ट्रेकर ‘मी सुपर नतालिया आहे, मला डोंगरावरील बर्फ आवडतो’ असेही म्हणाली.

Back to top button