Satara : पाचगणीत जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया | पुढारी

Satara : पाचगणीत जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : ऐन उन्हाळ्यात पाचगणी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे. टेबललँड रस्त्यावरील कॉनव्हेंट हायस्कूल शेजारी असणार्‍या व्हॉल्व्हला तसेच ग्रीनव्हॅली सोसायटीसमोर टाटा रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर व पाचगणीला पाणीपुरवठा करण्यासाठी 2001 मध्ये 56 दशलक्ष घनफूट पाणी साठवणक्षमता असणारे 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक धरण बांधण्यात आले. पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षाने हजारो लिटर पाणी गळती होत आहे. भविष्यात पाचगणीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची भिती निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा केंद्राच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. संबंधित अधिकार्‍यांना पाणी गळतीची कल्पना असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button