सातारा : भांबवलीत गव्यांचा मुक्त संचार | पुढारी

सातारा : भांबवलीत गव्यांचा मुक्त संचार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर नजीकच्या भांबवलीत एका गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला. सुमारे 16 गव्यांनी पठारावर मुक्तपणे फेरफटका मारला. त्यामुळे स्थानिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

कास पठार परिसरात असणार्‍या भांबवली, बामणोली, तापोळा या डोंगराळ भागात बिबट्यासह हिंस्त्र जंगली प्राण्यांचा सातत्याने वावर आढळून आला आहे. अनेकदा स्थानिकांना त्याचा फटका बसला आहे. भांबवली गावाच्या नजीक महाकाय गव्यांच्या कळपाने शेतात बिनधास्त रपेट मारली. काही गावकर्‍यांनी चारचाकीतूनच रानगव्यांची छबी आपल्या कॅमेर्‍यात टिपली. बैल कुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून या परिसरातील जंगलात रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन घडते. नुकताच स्थानिकांना 16 रानगव्यांचा कळप दिसला. गव्यांचा कळप दिसल्याने बघणार्‍यांचा थरकाप उडाला. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भांबवली रानगव्यांच्या कळपाने बिनधास्तपणे फेरफटका मारल्याने स्थानिकांचा थरकाप उडाला. भांबवलीचे जंगलात मोर, लांडोर, बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, भेकर, ससे असे प्राणी पाहायला मिळतात.

Back to top button