पाटण : ‘कोयने’त समाधानकारक पाणीसाठा | पुढारी

पाटण : ‘कोयने’त समाधानकारक पाणीसाठा

पाटण; गणेशचंद्र पिसाळ 
कोयना धरणात एक जूनपासूनच्या तांत्रिक जल वर्षापैकी दहा महिन्यांत धरणात 159.80 टीएमसी पाण्याची आवक झाली. या काळात पश्चिमेकडे विजनिर्मितीसाठी 55.99 पूर्वेकडे सिंचनासाठी 11.45, पूरकाळात 7.86 व विनावापर 46.45 अशा तब्बल 121.75 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात तब्बल 59.69 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

यावर्षी पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी ज्यादा पाणीवापर होऊनही आगामी दोन महिन्यांत ऐन उन्हाळ्यासाठी येथे समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी देण्यात येते. आतापर्यंत दहा महिन्यात यापैकी 55.99 टीएमसी पाणीवापर झाल्याने उर्वरित दोन महिन्यांसाठी 11.51 टीएमसी आरक्षित पाणीकोटा शिल्लक आहे. सिंचनासाठी वर्षभरात सरासरी 35 टीएमसी पाण्याची गरज असते.

आत्तापर्यंत सिंचनासाठी 11.45 टीएमसी इतकाच पाणीवापर झाला असून आगामी काळात सिंचनाच्या पाण्याचा मार्ग सुखकर आहे. आगामी काळातील वीजनिर्मिती, सिंचन व मृतसाठा लक्षात घेता धरणातील सध्याचा उपलब्ध एकूण 59.69 टीएमसी पाणीसाठा समाधानकारक आहे.

यावर्षी पावसाने आजवरचे विक्रम मोडीत काढले. मार्चअखेर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 700 मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे आहे. दरम्यान यावर्षी उन्हाळ तीव्र असला तरी धरणात समाधानकारक पाणीसाठी असल्याने दिलासा मिळाला आहे.

कोयना धरण – 31 मार्च 2022

                                                 31 मार्च 2022          31 मार्च 2021           तुलनात्मक फरक

  • पाणीसाठा                             59.69टीएमसी         63.29 टीएमसी            3.60 टीएमसी कमी
  • पाणीउंची                             2118.3 फूट             2122.4 फूट                4.1 इंच कमी
  • पश्चिम पाणीवापर                   55.99 टीएमसी        46.79 टीएमसी             9.20 टीएमसी ज्यादा
  • सिंचन पाणीवापर                  11.45 टीएमसी        21.78 टीएमसी            10.33 टीएमसी ज्यादा
  • पूरकाळात सिंचन पाणीवापर    7.86 टीएमसी    4.22 टीएमसी                    3.64 टीएमसी कमी
  • एकूण पाण्याची आवक        159.80 टीएमसी       132.97 टीएमसी          26.83 टीएमसी कमी
  • विनावापर सोडलेले पाणी        46.45 टीएमसी       23.99 टीएमसी          22.46 टीएमसी कमी

Back to top button