

सातारा : पुढारी ऑनलाईन
पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या तपासणीत तब्बल १ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केली आहे. दरम्यान ही रोकड नेमकी कोणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.