सांगली : शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

सांगली : शेकडो वर्षांची शाकाहारी परंपरा!

सांगली : पुढारी वृत्तसेवा ; सांगली जिल्हा हा तसा पाहिला तर कोल्हापूरप्रमाणेच मांसाहारप्रेमी जिल्हा ! प्रत्येक गावातील रस्त्या-रस्त्यांवरील आणि चौका- चौकांतील धाबे ही त्याचीच निशाणी आहेत; पण मांसाहार खवय्यांच्या या मांदियाळीतही जिल्ह्यातील एक गाव आपले 'शुद्ध शाकाहारीपण' टिकवून आहे, ते गाव म्हणजे खानापूर तालुक्यातील रेणावी. रेणावी गावी नवनाथांपैकी रेवणसिद्धनाथांचे ठाणे आहे. हे देवस्थान जागृत समजले जाते.

या गावात शेकडो वर्षांपासून मांसाहार वर्ज्य आहे. त्यामुळे संपूर्ण गावच शाकाहारी आहे. लग्न करून बाहेरून या गावात नांदायला येणाऱ्या सुनेलाही उंबऱ्यावरचे माप ओलांडण्याआधी मांसाहाराचा त्याग करावा लागतो. एवढेच नव्हे, तर या गावच्या जावयाचेही मांसाहार सोडून सगळे कोडकौतुक पुरविले जाते. कामधंदा आणि नोकरीनिमित्त या गावातून बाहेर जाणारी मंडळीसुद्धा आपला हा 'शाकाहार मंत्र' कटाक्षाने जपताना दिसतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news